जत येथील मुस्लिम समाज दफनभूमीचे विरंगुळ्याच्या ठिकाणासाठी प्रयत्न करू : सुरेश शिंदे

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जत येथील मुस्लिम दफनभूमीचे सुशोभीकरण व संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले असून स्वर्गीय पट्टू उर्फ इक्बाल गवंडी यांनी मुस्लिम समाजाला दिलेल्या शब्दाचे परीपूर्ण पालन झाल्याने वचनपूर्ती झाल्याचे समाधान राष्ट्रवादी पक्षाचे मातब्बर नेते सुरेशराव शिंदे सरकार यांनी व्यक्त केले. त्यांच्या सोबत उपनगराध्यक्ष आप्पा पवार यांनीही कबरस्तानमध्ये झालेल्या कामांची पाहणी करुन पुढील काळात मुस्लिम समाजाच्या विकासासाठी आपण निश्चितच चांगले काम करु अशी ग्वाही यावेळी दिली. जत नगरपरिषदेने चांगले काम केल्याबद्दल त्यांचा सत्कार, मुस्लिम समाजाच्यावतीने हाजी बंदेनवाज पटाईत यांच्या हस्ते करण्यात आला.
विठ्ठलनगरपुढे असलेल्या मुस्लिम समाजाच्या दफनभूमीची एकूण 11 एकर जागा उपलब्ध आहे.
माजी नगराध्यक्ष स्वर्गीय इकबाल उर्फ पट्टु गवंडी यांनी या दफनभूमीच्या विकासासाठी विशेष परिश्रम घेतले होते. संपूर्ण कंपाउंडचे कामासाठी 23 लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्याचे काम आत्ता शेवटच्या टप्प्यात म्हणजेच पूर्णत्वाकडे आले असल्याने नेते सुरेशराव शिंदे व उपनगराध्यक्ष आप्पा पवार यांनी पाहणी केली. दफनभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले आहे. आता दफनभुमीतील अंतर्गत रस्त्यांसाठी 19 लाखाचा निधी नगरोत्थान योजनेमधून प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. याबद्दल मुस्लिम समाजाच्याव्तीने दोघांचाही सत्कार करण्यात आला. सुशोभीकरण करण्यासाठी वृक्ष लागवड करण्यात आले आहे. पुढील काळात सांगली मार्केट कमिटीच्या मागे असणाऱ्या दफन भूमीप्रमाणे विरंगुळ्यासाठी बसण्याचे एक चांगले ठिकाण म्हणून आदर्श अशी दफनभूमी निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही सुरेशराव शिंदे यांनी यावेळी दिली.
यावेळी हाजी रशीदभाई पटाईत, इंजि. राजू इनामदार,प्राचार्य रियाज सय्यद,नजीरभाई चट्टरकी, औटे सर, मुन्ना पखाली, राजू मुल्ला, सलीम मुल्ला, एजाज हुजरे, इम्रान गवंडी, मेहबूब गवंडी, असलम जवलेकर, शफीक इनामदार, राजू इनामदार, डॉ. लालू हैद्राबादे,असलम हूजरे आदी उपस्थित होते.सामाजिक कार्यकर्ते डॉ. शफिक इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.