कोंतेवबोबलाद येथे मानव मित्र संघटना धावली मदतीला !

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

कोंतेवबोबलाद ता.जत येथील दत्ता परीट यांच्या घर व हॉटेलला पहाटे चारच्या सुमारास आग लागून अडीच लाखांचे नुकसान झाले.याची माहिती मिळताच श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मदतीस धावली.
कोंतेवबोबलाद येथील पोलीस चेक पोस्टजवळ दत्ता परीट यांच्या घर व हॉटेलला पहाटेच्या चारच्या सुमारास आग लागून घरामधील संसारोपयोगी साहित्य,१ तोळे सोने,कपडे,हॉटेलमधील फ्रीज,धान्य असे एकूण अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.सामाजिक बांधिलकी मानून ह.भ.प तुकाराम बाबा महाराज यांनी मदत केली.
यावेळी कोंतेवबोबलाद गावचे सरपंच पुंडलिक कांबळे,रमेश माळी,सोहन धुमाळ,ऋषी दोरकर,शंकर सावंत उपस्थित होते.