डफळापूर जि.प.मतदार संघातील विकासाचा अनुषेश भरून काढू: आ. विक्रमसिंह सांवत ;विविध विकासकामांचे भूमिपूजन

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

अंकले ता.जत येथील विविध विकास कामाचे भूमीपुजन आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी धावडवाडी येथे हिवरे रस्त्यापासून शिरीमळा खडीकरण, मुरुमीकरण, हिवरे येथे शाळा खोल्या बांधकाम, डोर्ली येथे ब्राह्मणाथ देवाकडे जाणार रस्ता खाडीकरण मुरुमीकरण, अंकले येथे शाळा खोल्या व के.टी वेअर, बेळंखी येथे शाळा खोल्या बांधकाम या सर्व कामांचे भूमिपूजन आमदार सावंत यांनी केले.
आमदार सांवत व जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील यांच्या प्रयत्नातून ही विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. डफळापूर जिल्हा परिषद मतदार संघातील विकासाचा अनुषेश भरून काढू असे यावेळी आ.सांवत म्हणाले. यावेळी जि.प. सदस्य महादेव पाटील,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पाराया बिराजदार, माजी पं.स.सभापती बाबासाहेब कोडग, पं.स.सदस्य दिग्विजय चव्हाण, जत मार्केट कमिटी माजी सभापती अभिजित चव्हाण माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक सरगर, उद्योगपती संभाजी दुधाळ,भाऊसाहेब दुधाळ, काशिलिंग खामगळ, सरपंच,उपसरपंच व गावातील सदस्य ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.