अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत तालुक्यातील कंठी येथील विविध विकास कामाचे भूमीपूजन आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जानकरवस्ती येथे अंगणवाडी शाळा खोली, जिल्हा परिषद शाळा खोली, कंठी ते बागेवाडी रस्ता डांबरीकरण व हनुमान मंदिरासमोर सभामंडप या कामांचे भूमिपूजन आमदार सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अप्पाराया काका बिराजदार, माजी पं.स.सभापती बाबासाहेब तात्या कोडग, जि.प.सदस्य महादेव पाटील, युवक नेते शिरू (तात्या)पाटील,श्रीनिवास पाटील, ग्रा.प.सदस्य तुकाराम इरकर, माजी सरपंच बिराप्पा पाटील, ग्रा.प.सदस्य रवी पाटिल, घुगरे सर, मोटे सर, माजी सरपंच शंकर मोटे, सरपंच, उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन