अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
काराजनगी ता. जत येथे दुपारी १ वाजताच्या सुमारास चिमाबाई सुरेश घाटे (कोळी) यांचे छप्पर वजा राहते घर आगीत जळून खाक झाले.यामध्ये अंदाजे १ लाख,६५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,
काराजनगी गावाशेजारी चिमाबाई घाटे यांचे छप्पर वजा घर आहे.सध्या ज्वारीच्या सुगीचे दिवस असलेने घरी कोणीच नसताना घर आगीत जळून खाक झाले.ग्रामस्थांनी आग विजवणयाचा प्रयत्न केला मात्र कडक उन्हात आगीने भयानक रूप धारण केल्याने आग विजवण्यास अपयश आले.
यामध्ये चार पोती धान्य,दीड तोळे सोने,१५०० पेंडी कडबा, रोख रक्कम ५००० रू, कपडे व जीवनावश्यक वस्तु,संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.यामध्ये अंदाजे १,६५,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. घाटे कुटूंबियांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच गावकामगार तलाठी अभिजित सोनपरोते यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन