जांभुळणीत समाजकल्याण विभागाचा १०.५ लाखांचा विकासनिधी मंजूर

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
आटपाडी तालुक्यातील जांभुळणी येथे माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या विशेष प्रयत्नातून दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत १०.५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती सरपंच सौ.संगिता शिवराम मासाळ यांनी दिली.
पेव्हिंग ब्लॉक बसविणे,रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, हाफ राउंड गटर करणे,हायमास्ट दिवे बसवणे,यासाठी हा निधी सरपंच सौ.संगिता शिवराम मासाळ व बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष भाई शिवराम मासाळ यांनी याबाबत सांगली जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती प्रमोदआप्पा शेंडगे यांच्याकडे पाठपुरावा केला.
जांभुळणी गावामध्ये वेगवेगळ्या योजना राबवून सरपंच दाम्पत्याने गावाचा चौफेर विकास करण्याचे व्रत स्वीकारले आहे. गावातील या भागात सुविधाची कमतरता आढळल्यानंतर याबाबत तातडीने समाजकल्याण विभागाकडे पाठपुरावा करून हा निधी मंजूर केला आहे.