अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
येसलेवाडी (ता.शिराळा ) या डोंगरी,दुर्गम भागातील संकटात सापडलेल्या करण तुकाराम येसले या विद्यार्थ्याच्या दवाखाना औषध उपचार खर्चासाठी आरळा येथील गांधी सेवाधाम विद्यालयाकडून आर्थिक मदत देण्यात आली.
मोबाईल बॅटरी व जिलेटिन कांडी याच्या स्फोटात डोंगरी दुर्गम भागात राहणाऱ्या करण येसले हा शालेय विद्यार्थी जखमी झाला होता. डोळा,चेहरा,ओठ इत्यादी भागास जबर दुखापत झाल्याने ऑपरेशन करणे गरजेचे होते. आर्थिक दुर्बल असणाऱ्या या कुंटूबास दवाखान्याचा खर्च न परवडणारा असल्याने त्यास मदतीसाठी दैनिकांनी मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत डोंगरी भागात विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करणारे विद्यालयातील समाजशील शिक्षक सुधीर बंडगर यांनी पुढाकार घेत विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांच्याकडून आर्थिक मदत संकलीत केली.मुख्याध्यापक आर एस. हसबनीस यांच्या हस्ते पालक तुकाराम येसले यांच्याकडे ही आर्थिक मदत सर्पूद करण्यात आली. यावेळी प्र. पर्यवेक्षक ए.एस. घोरपडे,विद्यालयातील सर्वं शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. संकटकाळात मदत करणाऱ्या विद्यार्थ्याचे व शिक्षकांचे पालक तुकाराम येसले यांनी आभार व्यक्त केले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद