जळभावीत वाळू वाहतूक करणा-या ट्रॅक्टरवर कारवाई

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

माळशिरस पोलिसांनी जळभावी येथे अवैधरीत्या वाळू वाहतूक करणा-या २ ट्रॅक्टरवर सापळा लावत १३ लाख,४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
माळशिरस पोलीस स्टेशनचे कर्मचारी रात्रीचा गस्त घालत असताना जळभावी येथे अवैद्यरित्या वाळू वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार म्हसवड रोडनजीक जळभावी पाटी येथे रात्री २ वाजण्याच्या सुमारास लाल रंगाचा महिंद्र ५७५ डी.आय बिगर नंबरचा लाल पिवळ्या रंगाचा डंपिंग (किमंत ६ लाख, ७ हजार) तर दुसरा लाल पांढ-या रंगाचा स्वराज MH45 F3043 (किमंत ६ लाख, ७ हजार) यामधून वाळू वाहतूक करत असतानाचे निदर्शनास आले. ट्रॅक्टरमध्ये प्रत्येकी १ ब्रास वाळू आढळून आली.यानुसार माळशिरस पोलिसात पोलीस नाईक लेंडवे यांच्या तक्रारीनुसार दोन अनोळखी इसम यांच्यावर भा.द.वि ३७९ व ३४ कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास माळशिरस पोलीस करीत आहेत.