अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
जत तालुक्यातील खैराव येथे गॅसचा स्फोट होवून दीपक बाळू ढगे यांचे पत्र्याचे घर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.शनिवारी दुपारी ही घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली.या घटनेत ढगे यांचे संपूर्ण घर जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच तातडीने आमदार विक्रमसिंह सावंत,पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब कोडग, खैरावचे सरपंच राजू घुटूकडे,कोडीबा घुटूकडे,भारत शिरसागर, जैनू मुलाणी, येळवीचे उपसरपंच सुनील अकंलगी,दीपक अकंलगी,प्रवीण तोडकर, आदीजन घटनास्थळी भेट देऊन ढगे कुटूंबियांना धीर देत,स्वखर्चातून जीवनोपयोगी वस्तू देण्यात आल्या.
खैराव येथे दीपक ढगे यांची वस्ती आहे. तेथे त्यांचे पत्र्याचे घर आहे. शनिवारी ढगे यांच्या घरातील महिला या गॅसवर दूध तापवत असताना गॅसने अचानक पेट घेतला व काही कळायच्या आत गॅसचा स्फोट झाला.या गॅस स्फोटात काही वेळातच पत्र्याच्या शेडला आगीने वेढले.या दुर्घटनेत ढगे यांनी घरात आणून ठेवलेले रोख एक लाख रुपये, तीन तोळे सोने, दीड ते दोन लाखाचे संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले.
यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत बोलताना म्हणाले की,शासनाच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती