माळशिरसमध्ये पहाटे दहा-बारा दुकानाला आग; साहित्य जळून खाक, पालकमंत्र्यांचा दिलासा

पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी नुकसानग्रस्त दुकानदारांना दिला दिलासा
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

माळशिरसमध्ये आज पहाटे 3:30 वाजता अचानक लागलेल्या आगीमध्ये एसटी स्टँडसमोरील दहा ते बारा दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी जळीतग्रस्त दुकानाला भेट दिली. वस्तुस्थितीची पाहणी करून प्रशासनाला पंचनामे करून सहकार्य करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी विधानपरिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य तुकारामभाऊ देशमुख, नगरसेवक मारुती देशमुख, ॲड.सोमनाथ वाघमोडे, सचिन वावरे, अशोक देशमुख,आदी मान्यवरांसह दुकान जळीत झालेले सर्व दुकानदार उपस्थित होते.
पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी दुपारी दोन वाजता जळीतग्रस्त दुकानदारांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दुकानदारांनी पालक मंत्री यांना निवेदन दिलेले आहे.पालकमंत्र्यांनी महसूल प्रशासन व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ.विश्वनाथ वडजे यांना पंचनामे करून झालेल्या लोकांची नुकसान भरपाई मिळवण्याकरता प्रयत्न करावेत.सध्या आचारसंहिता असल्यामुळे मी ठोस असे आश्वासन देत नाही. मात्र दुकानदारांसमवेत असल्याचे सांगितले.नुकसानग्रस्त दुकानदारांना दिलासा मिळाला आहे.