बसपाचे तालुकाध्यक्ष तानाजी व्हनखंडे यांचे उपोषण कृषी अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मागे

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

संख ता.जत येथील शेतकऱ्यांचे फळबाग लागवडीचे अनुदान तात्काळ देण्यात यावे व कृषी सहायक यांची चौकशी करून नवीन कृषी सहायक यांची नियुक्ती करावी या मागणीसाठी 30 मार्च 2021 पासून उपोषण करण्यात येणार होते.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर व तालुका कृषी अधिकारी हनुमंत मेडीदार यांनी लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आल्याची माहिती बसपाचे तालुकाध्यक्ष तानाजी वानखडे यांनी दिली.
कृषी अधिकारी यांनी पत्रात म्हटले आहे की,सन 2018-2019, 2019-2020 व 2020-2021 मधील फळबागा लागवड केलेले शेतकऱ्यांचे अनुदान शासनाकडून प्राप्त झाल्यास तात्काळ जमा करण्यात येईल. संखमध्ये असलेले कृषी ऑफिस तात्काळ चालू करून ऑफिसमध्ये कृषी सहायकास बसण्यास कारवाई केली आहे. सध्या कार्यरत असलेल्या कृषी सहायकाच्या कामाची चौकशी करून तात्काळ त्याच्यावर कायदेशीर चौकशी चालू केली आहे.संख येथील नवीन कृषी सहाय्यकाची नेमणूक करावी, या मागण्या तात्काळ मान्य करण्यात आल्यामुळे 30 मार्च, 2021 होणारे उपोषण तानाजी व्हनखंडे यांनी मागे घेतले आहे.