अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी म्हैसाळच्या पाण्यासाठी संख ते मुंबई पायीदिंडी काढली होती. या जलदिंडीत सहभागी झालेले जत तालुक्यातील माडग्याळ येथील 32 वर्षीय दशरथ महादेव सुतार यांचा गुरुवारी सकाळी सहा वाजता अल्प आजाराने मृत्यू झाला.
दशरथ सुतार हे तुकाराम बाबा यांच्या कार्यात कायम अग्रेसर असत. दोन वर्षापूर्वी तुकाराम बाबा यांनी जतला म्हैसाळचे पाणी मिळाले पाहिजे या मागणीसाठी ऐतिहासिक संख ते मुंबई ४५० किलो मीटर पायी दिंडी काढली होती. या दिंडीत दशरथ सुतार हे अग्रभागी होते. जत पूर्व भागाला पाणी मिळावे यासाठी त्यांनी तुकाराम बाबा महाराज यांच्या खांद्याला खांदा लावून कार्य केले.
दशरथ सुतार यांच्या निधनाने पायी जल दिंडीतील योद्धा काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती