
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
कोरोनामुळे रक्ताची टंचाई निर्माण झाल्यामुळे शहीद दिनानिमित्त जिव्हाळा फाऊंडेशन आणि सुविधा हॉस्पिटल यांनी संयुक्तपणे आयोजित केलेले रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. यामध्ये 21 महिला 84 दात्यांनी रक्तदान केले. शहीद दिनानिमित्त दरवर्षी जिव्हाळा फाऊंडेशन आणि सुविधा हॉस्पिटल संयुक्तपणे रक्तदान शिबिर घेऊन भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव यांचा बलिदान दिवस साजरा केला जातो. यावर्षीही रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.तहसीलदार सचिन मुळीक यांच्या हस्ते शहीदांच्या प्रतिमेला हार घालून शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील,आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात, डॉ. विनय पत्की, डॉ. अनिरुद्ध पत्की,डॉ.रावण,श्रीनाथ पाटील,ग्रामपंचायत सदस्य विजय देवकर, जिव्हाळा फाउंडेशनचे अध्यक्ष उत्तम बालटे, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष यु.टी. जाधव,प्रा.विश्वनाथ जाधव, सतिश भिंगे उपस्थित होते. या शिबिरामध्ये एकवीस महिलांनी रक्तदान केले. एकूण 84 जणांनी रक्तदान केले.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती