अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी येळदरी येथील सिद्राम आडव्याप्पा माने यांच्या शेतास भेट देऊन तेथील जळालेल्या घराची पाहणी केली.तसेच त्यांच्याशी चर्चा केली,पंचनाम्याबाबत चर्चा केली. त्यांना जीवनावश्यक वस्तू व संसारोपयोगी साहित्य दिले.त्याचबरोबर घरकुल योजनेचा लाभ तसेच कृषी विभागातील योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले. जगण्याची नव्याने उमेद निर्माण केली. तसेच लहान मुलांना मोफत औषध उपचार देण्याची व्यवस्था केली. यावेळी कामगार सेनेचे तालुकाप्रमुख सुरेश घोडके व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.या भेटीमुळे निराश झालेल्या माने यांना मोठा आधार वाटला.त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पाहण्यास मिळाले. महाराष्ट्र कामगार सेना नेहमीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना आतापर्यंत मदत करीत आलेली आहे.यापुढेही मदत करत राहील असे प्रतिपादन महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन