मानवमित्र संघटनेची घर जळालेल्या कुटुंबाला मदत!

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जत तालुक्यातील तिकोंडी या गावी दि. 21 मार्च रोजी श्रीमती काशीबाई बसप्पा चौधरी वय(55)यांचे छप्पर वजा पत्र्याचे घर जळून खाक झाले आहे.राहते घरी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन जळाले होते. त्यामध्ये त्यांचे 5 ते 7 लाख रुपयांचे नुकसान झाले होते.
ही घटना तिकोंडी गावच्या मानवमित्रांनी लगेच संघटनेचे सर्वेसर्वा ह. भ. प . तुकाराम बाबा महाराज व पदाधिकारी याना फोनद्वारे सांगितली होती. बाबा काही कामानिमित्त बाहेर असल्यामुळे त्यांनी मानव मित्र यांना आदेश देऊन योग्य माहिती घेण्यास सांगितले .मानवमित्र संघटनेचे पदाधिकारी यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या ठिकाणी जाऊन चौकशी करून त्या पीडित कुटुंबाला आपल्या संघटने तर्फे आर्थिक मदत केली.यावेळी तिकोंडीचे मानव मित्र रायगोंडा राचगोंड,उपसरपंच बसवराज पाटील,सदाशिव पाटील,भिवर्गीचे संतोष व्हनमोरे उपस्थित होते.