अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:
जत तालुक्यातील तिकोंडी येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन काशीबाई बसाप्पा चौधरी यांचे छप्पर वजा पत्र्याचे घर जळून खाक झाले आहे. यामध्ये सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटना स्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, तिकोंडी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चौधरीवस्ती येथे काशीबाई चौधरी यांचे कुटुंब राहते. रात्री अचानक काशीबाई यांच्या आईला लकवा मारल्याने सकाळी कराड या ठिकाणी उपचारास नेण्यासाठी तिकुंडी गावात आले होते. परत जाऊन पाहिले असता गॅसचा स्फोट होऊन छप्पर वजा पत्र्याचे घर जळून खाक झाले होते. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान घडली. स्फोट इतका भयानक होता की, दोन किमी परिसरात त्याचा आवाज घुमत होता. स्फोटाचा आवाज ऐकून आग विजवण्यासाठी गावातील लोकांनी धाव घेऊन आग विजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले.
शुक्रवारी माडग्याळ जनावर बाजारात शेळी विकून आलेले रोख २५ हजार रुपये, संसार उपयोगी साहित्य, २० हजार रुपये किंमतीची बागेची औषधें ,२ तोळे सोने, २ तोळे चांदी व ५ पोती ज्वारी व कडधान्ये जळून अदाजे ५ ते ७ लाख रुपयापर्यत नूकसान झाले आहे. वेळीच सावध झाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. चौधरी कुटुंबाकडे स्वतःचे कपडे सोडून त्यांच्याकडे काहीच शिल्लक उरले नाही. हे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर पडले आहे. ह्या घटनेने परिसरातील लोक हळहळ व्यक्त करत आहेत. पीडित कुटुंबाला जास्तीत जास्त प्रशासन व इतर माध्यमातून मदत करावी अशी मागणी चौधरी कुटुंबातून होत आहे. घटनास्थळी उशीरापर्यत पंचनाम्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी कोणीच फिरकले नाही.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती