अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
संख ता.जत येथील शेतकऱ्यांचे फळबाग लागवडीचे अनुदान तात्काळ देण्यात यावे व कृषी सहाय्यकाची चौकशी करून नवीन कृषी साहाय्यकाची नियुक्ती करावी या मागणीसाठी 30 मार्च, 2021 पासून उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन बसपाचे तालुकाध्यक्ष तानाजी व्हनखंडे यांनी कृषी कार्यालयात दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,सन 2018-2019 वे 2019-2020 व 2020-2021 मधील फळबागा लागवड केलेले शेतकऱ्यांचे अनुदान तात्काळ जमा करण्यात यावे.संखमध्ये असलेले कृषी ऑफीस तात्काळ चालू करुन ऑफीसमध्ये कृषी सहाय्यकास बसण्यास सांगितले पाहिजे.सध्या कार्यरत असलेले कृषी सहाय्यकाचे कामाचे चौकशी करुन तात्काळ त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व संख येथे नवीन कृषी सहाय्यकाची नेमणूक करावी.तरी वरील मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्यात. मागण्या मान्य न केल्यास संख येथील शेतक-यांसोबत दि. 30 मार्च रोजी उपोषणास बसणार आहे.उपोषणाच्या दरम्यान कोणतीही नुकसान झाल्यास तालुका कृषि अधिकारी यांना संपूर्णपणे जबाबदार धरण्यात येईल.त्याची त्यांनी तात्काळ याची नोंद घ्यावी,असे व्हनखंडे यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती