सुभाष हाक्के
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/कोसारी:
जत पंचायत समिती प्रशासनाने खाजगी मोबाईल कंपनीला शिकवला धडा असून सरदार पाटील,नाथाजी पाटील,नानासाहेब भोसले आणि उत्तम महारनुर यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.प्रशासनाने पंचवीस लाख वीस हजार रूपयांचा दंड करून झालेल्या खराब साईडपट्टीचे काम दुरूस्त करून देण्याचे आदेश दिले आहेत.
मौजे कुंभारी ते सिंगनहळ्ळी या रस्त्यावर एअरटेल केबल लाईनचे खाजगी काम विनापरवाना आणि अनधिकृतपणे चालू होते.गावातील काही सूज्ञ नागरिकांनी या कामाची चौकशी करून हे काम अनधिकृत होत असल्याचे समजल्यावर संबंधित प्रशासनाकडे तक्रार अर्ज दाखल केला होता.
प्रशासनाने याची पाहणी करून काम थांबविण्यात आले.रितसर कारवाई करत झालेल्या कामावर दंडात्मक कारवाई केली.पंचवीस लाख वीस हजार रूपयांचा दंड करून झालेल्या खराब साईडपट्टीचे काम दुरूस्त करून देण्याचे आदेश दिले आहेत.तोपर्यंत केबल लाईनचे खुदाई काम करण्यास परवानगी मिळणार नाही असे बांधकाम उपविभाग पंचायत समितीच्या संबंधित पदाधिकारी यांनी सांगितले आहे. ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब भोसले यांनी ही माहिती दिली.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन