पत्रकार देवानंद जावीर यांना मातृशोक!

कविता यादव
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ दिघंची:

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रचे सांगली जिल्हा संघटक पत्रकार देवानंद जावीर यांच्या मातोश्री जनाबाई कोंडीबा जावीर यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आज सोमवार दि.२२ मार्च रोजी सकाळी उपचारादरम्यान निधन झाले.
दुपारी एक वाजता दिघंची येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात मुलगा देवानंद व सुभाष,तसेच सुना, नातवंडे व मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार दि. २४ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता दिघंची येथे होणार आहे.