महाराष्ट्रातील कन्नड विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय थांबवा -अंबादास चौगुले

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये कन्नडमधून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची बेकारी वाढत चालली आहे. सुशिक्षित बेकारांची संख्या खूप आहे. सांगली, सातारा , कोल्हापूर , सोलापूर ,मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कन्नड भाषिक शाळा आहेत. शिक्षण पूर्ण करूनही केवळ कन्नड भाषेतून शिक्षण घेतल्यामुळे स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्याची संख्या नगण्य आहे. त्यामुळे अशा सुशिक्षित तरुणांची नोकरीअभावी हाल सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने अशा सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरी देऊन त्यांच्यावर होणारा अन्याय थांबवावे अशी मागणी पदवीधर संघटनेचे जत तालुका सचिव अंबादास चौगुले यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्यातील रहिवासी आहेत आणि कन्नड भाषेतून शिक्षण घेऊन बाहेर पडुन नोकरीचा शोध घेतात अशा विद्यार्थ्यांना नंतर कळते की कन्नड भाषेतून शिक्षण घेऊन काहीच उपयोग नसल्याचे जाणीव होते. कारण कन्नड शिक्षण घेऊन महाराष्ट्रात नोकरी करण्यासाठी प्रयत्न करताना सीईटी परीक्षा द्यावी लागते. त्यामध्ये २५ मार्कचे मराठी व्याकरण असते. कन्नड भाषेतून शिक्षण घेतल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण जमत नाही.स्पर्धा परीक्षा त्याला कठीण जाते. तो स्पर्धा परीक्षेतून बाहेर पडतो. नंतर तो कर्नाटक राज्यामध्ये स्पर्धा परीक्षा देण्यासाठी जातो त्यावेळी तेथील प्रश्नपत्रिका वेगळ्याच असतात. कर्नाटक राज्यातील अभ्यासक्रम वेगळाच असतो आणि शिकेलल्या अभ्यासक्रम व पाठ्यक्रमावर स्पर्धा परीक्षा आधारित नसल्याने महाराष्ट्रातील कन्नड भाषिक विद्यार्थ्यांना कठीण जाऊन स्पर्धेबाहेर पडावे लागते. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात ज्या-ज्या ठिकाणी मराठी भाषामध्ये परीक्षा घेतली जाते,अशा ठिकाणी कन्नड माध्यम विद्यार्थ्यांना कन्नड भाषेतून परीक्षेची सोय करून देण्यात यावी अशी प्रामुख्याने मागणी आहे. तसेच कर्नाटक राज्यात कन्नड अभिवृद्धी प्राधिकरण या संस्थेने घोषित केले आहे की, महाराष्ट्र राज्यात व इतर राज्यात सीमा भागावरती असणाऱ्या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना गडीनाडू कन्नड म्हणून आरक्षण दिले आहे. याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातसुद्धा कन्नडमधून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश गडीनाडू कन्नड म्हणून गृहीत धरले जाते, मात्र नोकरीमध्ये आरक्षण मिळत नाही हा एक प्रकारे अन्याय आहे. महाराष्ट्र राज्यात शिकत असलेल्या कन्नड विद्यार्थ्यांना होरनाडू कन्नड म्हणून घोषित करून त्यांना नोकरीत 5 टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी आंबादास चौगुले यांनी केली आहे.