रस्ता कामाबाबत पीडब्ल्यूडी उत्तर देईना!
३-४ दिवसांचा अल्टिमेटम!
थेट मंत्र्यांच्या दारातच आंदोलन:युवानायक अनिलशेठ पाटील
नरेंद्र दिक्षीत
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
दिघंची ते टोप वडगाव या रस्त्याच्या कामाबाबत मोठ्या प्रमाणात आंदोलन करूनही पीडब्ल्यूडीचे अधिकारी उत्तर देत नाहीत. तसेच कामामध्ये बाधित लोकांचे सुमारे 329.45 लाख रुपये आले असून ज्यांचे घर किंवा जागा रस्त्याच्या कामात गेले, त्यांना त्याचे पैसे मिळाले नाहीत.येत्या तीन-चार दिवसात याबाबत अधिकाऱ्यांनी उत्तर दिले नाही, तर थेट मंत्र्यांच्या घरासमोरच आंदोलन करू, असा इशारा युवानायक अनिलशेठ पाटील यांनी आटपाडी येथे पत्रकार परिषदेत दिला.
दिघंची ते टोप वडगाव या राज्यमार्गाचे काम सुरू आहे. राजपथ कंपनीकडे या कामाचा ठेका आहे. आटपाडी येथील चैनेज 117/100 ते 117/500 हा रस्ता गायब झाल्याचा प्रकार त्यांनी पत्रकार परिषद घेऊन समोर आणला.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारले.आटपाडी येथील राजपथ कंपनीचे काम त्यांनी चुकीचे असल्यामुळे बंद करण्यास भाग पाडले.त्यानंतर त्यांनी कार्यालयात जाऊन माहिती विचारली. अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामाबाबत माहिती व योग्य उत्तर देण्यास टाळाटाळ केली.त्यावेळी संतप्त होऊन अनिलशेठ पाटील यांनी आटपाडी येथील कार्यालयास टाळे ठोकले व अधिकाऱ्यांना कोंडून ठेवले. पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून अनिल पाटील व उपअभियंता सुभाष पाटील यांची चर्चा घडवून आणण्याचे ठरल्यानंतर टाळे खोलण्यात आले.
परंतु अधिकारी मात्र चर्चेला सामोरे येत नाहीत,उत्तर देत नाहीत, हे लक्षात येताच आता त्यांनी थेट मंत्र्यांच्या दारातच आंदोलन करण्याचे आटपाडी येथील पत्रकार परिषदेत घोषित केले आहे.यासाठी तीन-चार दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.
युवानायक अनिलशेठ पाटील म्हणाले :
१) रस्त्याच्या कामासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करून देखील संबंधित पीडब्ल्यूडीचे अधिकारी अजून समोर आले नाहीत.कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नाही.
२) प्रशासन उत्तर देत नाही,त्यामुळे डायरेक्ट याचा जाब आता मंत्री महोदयांना विचारणार आहे.
३) येत्या 3-4 दिवसांत योग्य उत्तर नाही दिले,तर मंत्री दत्तामामा भरणे यांच्या घरासमोर आंदोलन करू,त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करू!
४) या आमच्या गावाच्या नुकसानाला चीफ इंजिनिअर, PWD अधिकारी सुभाष पाटील जबाबदार आहेत.
५) लँड अक्विजिशन अँड ट्री कटिंग साठी सुमारे 3 कोटी 29 लाख 45 हजार रुपये आले असून
ज्यांची घर किंवा जागा रस्त्याच्या कामात गेले असून त्यांना त्याचे पैसे मिळाले नाहीत.याला पूर्ण जबाबदार PWD चे अधिकारी पाटील हे आहेत.
६) हा माझ्या गावाच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि या लढ्यात मी गावातील प्रत्येक नागरिकांना भेटून त्यांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात जनआंदोलन करणार आहे.
७) या सर्व सिस्टीममध्ये जे-जे अधिकारी दोषी आहेत, त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कार्यवाही झाली पाहिजे.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन