मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या पुरोगामी सेवा मंडळाने अनेक सभासद हिताचे निर्णय घेतल्याने विरोधकांच्या डोळ्यात अंजन घातल्यासारखे झाले आहे .त्यामुळे त्यांना झोंबू लागल्याने शिक्षक बँकेच्या कामधेनू विरोधात वाट्टेल ते बडबडणे सुरू आहे.त्यांचा हा नाटकी नगारा सुज्ञ सभासदांच्या माध्यमातूनच आम्ही फोडणार असे प्रतिपादन शिक्षक बँक माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक यु.टी.जाधव यांनी केले.
सत्ताधारी शिक्षक समितीवरच सभासदांचा पूर्ण विश्वास आहे. कारण दीड वर्षाचा विरोधकांचा तमाशा सुज्ञ सभासदांनी अनुभवला आहे. त्यामुळे सत्तेच्या चाव्या पुन्हा शिक्षक समितीकडेच देण्याचा निर्धार सुज्ञ,अभ्यासू सभासद यांनी केला आहे. विरोधक नेहमी सत्ताधारी संचालकांना नामधारी म्हणून हिणवतात.परंतु सर्व संचालक कामधारी व निष्ठावंत आहेत, हेही त्यांनी जाणून घ्यावे. काहीजण तर निवडणुकीच्या मैदानात तिकीट मिळविण्यासाठी केविलवाणी धडपड व लुडबुड करीत आहेत. लाभांशासंदर्भात आरबीआयचे पत्र पाहूनसुद्धा सोयीस्करपणे कानाडोळा करणार्यांकडे सभासद त्यांचे अपूर्ण स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाहीत. काहीजणांवर सत्तेविना सेवानिवृतीची वेळ आणणार यावर आमचा ठाम विश्वास आहे.सभासदांच्या मागणी वरूनच कायम ठेवी परत करण्याचा निर्धार सत्ताधाऱ्यांनी केल्याने विरोधकांचा पोटशूळ का उठावा? स्टॅम्प ड्युटी कमी करून सभासदांचे हजारो रुपये सत्ताधाऱ्यांनी वाचविले. टप्प्याटप्याने कर्जाचे व्याजदर खाली आणले आणि अजूनही आम्ही ते करणार आहोत.मृत संजीवनी ठेव योजनेच्या माध्यमातून दुःखितांचे अश्रू पुसून कुटुंबीयांना आधार देण्याचे मोठे काम केले आहे. डीसीपीएस बांधवांसाठी २ लाखाचा जादा मदतनिधी,शिवाय विरोधकांनी ६ % शेअर्स रक्कम केली होती.ती आम्ही १ टक्क्याने कमी करून सामान्य सभासदांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे पचनी पडत नसल्यानेच ऊठसूट कामधेनूला बदनाम करणाऱ्यांना सभासदच बरबाद करतील.यात कोणतीही शंका नाही.
यावेळी तालुकाध्यक्ष शामराव ऐवळे ,शिक्षक नेते अधिकराव खांडेकर,धनाजी देठे,विश्वास पुजारी,श्रीकांत राजे,अजय राक्षे,दिपक कुंभार, बाबासाहेब शेख,संजय कबीर,सत्यवान माने,हैबतराव पावणे,भास्करराव डिगोळे,हरिदास जावीर,ज्योतीराम सोळशे,सतीश मदने,शिवाजी खताळ,यशवंतराव मोरे, वामनराव सोळंकी, सत्यजित भांबुरे ,बाळासाहेब ठोंबरे, नानासाहेब झुरे,आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती