वीजबिलांचे हप्ते बांधले:अमोल मोरे
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
कोरोनाकाळात नागरिकांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे.त्यामुळे नागरिकांची आर्थिक स्थिती अजून पूर्वपदावर आली नाही.त्यामुळे वीज वितरण कंपनीने वीजबिल न भरणाऱ्या नागरिकांच्या बिलाचे हप्ते बांधून द्यावेत अशी मागणी सरपंच अमोल मोरे यांनी केली. यावर आटपाडी वीज वितरण कार्यालयाचे अभियंता संजय बालटे व सरपंच अमोल मोरे यांची चर्चा होऊन वीज बिलामध्ये हप्ते बांधण्याचा तोडगा काढण्यात आला. यामुळे वीज ग्राहकांना एकरकमी वीजबील भरण्याऐवजी हप्त्याने वीजबिल भरण्याचा आधार मिळाला आहे.
सरपंच अमोल मोरे यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले की, नागरिकांची वीज बिल भरण्याची तयारी आहे.परंतु कोरोना काळातील थकीत बिल एकरकमी भरण्याएवढे पैसे जुळवताना नागरिकांची दमछाक होत आहे.थकीत बिल भरण्याची मानसिकता नागरिकांची आहे.तसेच वसुली करताना दिघंची ग्रामपंचायत देखील सहकार्य करेल,अशी ग्वाही सरपंच अमोल मोरे यांनी दिली आहे.
कोरोना महामारीमुळे आधीच नागरिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे.आत्ता थोडी थोडी बाजारपेठ पूर्वपदावर येऊ पाहत आहे.त्यात सरसकट वीज बिल न भरता कनेक्शन कट केल्याने नागरिकांचे हाल होत आहे.तरी वीज वितरण कंपनीने थकीत विजबिलांचे हप्ते बांधून द्यावेत व नागरिकांना सहकार्य करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,याची दखल महावितरण कंपनीने घ्यावी असा इशारा देण्यात आला होता.
या अनुषंगाने वीज वितरण कंपनीचे अभियंता संजय बालटे व सरपंच अमोल मोरे यांची यावर चर्चा होऊन वीज बिलाबाबत हप्ते बांधून देण्याचा निर्णय झाला. याबाबतचे आदेश दिघंची विभागाच्या कार्यालयाला देण्यात आल्याचे सांगितले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद