विठलापूर येथील बाड कुटुंबियांनी केले अस्थींसमवेत वृक्षारोपन !
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
आपल्या जन्मदात्रीच्या स्मृतींना तहयात उजाळा देण्यासाठी आटपाडी तालुक्यातील विठ्ठलापूर येथील प्रमोद बाड व प्रवीण बाड या पुत्रांनी पर्यावरणपूरक आधुनिक दृष्टिकोन अवलंबून रक्षाविसर्जनाच्या वेळी जननीच्या अस्थींसमवेत वृक्षारोपण करून क्रांतिकारी पायंडा पाडला आहे.
आपल्या संस्कृतीत आईला अनन्यसाधारण महत्त्व असून ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ असे म्हटले जाते. आई म्हणजे मायेचा सागर.’आई अमृताची धार’ याची प्रचिती सर्वांना अनुभवायला पुन्हा आली.
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी संचालिका,विठलापूर येथील कै.सुशिला विश्वनाथ बाड यांच्या दुर्दैवी निधनाने विठलापूर पंचक्रोशी व दुःखाची छाया पसरली. त्यांच्या रक्षा विसर्जनानिमित्त आपल्या आईच्या स्मृती कायम तेवत रहाव्यात यासाठी त्यांचे चिरंजीव प्रमोद बाड व प्रवीण बाड या दाम्पत्यांनी आपल्या मुलांसह आईच्या अस्थींसमवेत वृक्षारोपण करण्याचा क्रांतिकारी उपक्रम हाती घेऊन सामाजिक संकल्प जोपासला.अनेक मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले.शिवाय त्यांच्या आठवणींना, स्मृतींना कायम स्मरणात ठेवण्याचा संकल्प खरोखरच दुःखातून सावरण्याचा कौतुकास्पद असल्याने त्याचे स्वागत करण्यात आले.



संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद