दिघंचीत विजेच्या धक्क्याने युवकाचा दुर्देवी मृत्यू

कविता यादव
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/दिघंची:

दिघंची येथे सौरभ संजय शिलवंत ( वय 21 वर्षे ) या युवकाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला.
तो उंबरगाव येथील मूळचा रहिवासी होता.
दिघंची येथे राहत्या घरी पाणी भरत असताना घरगुती विद्युत पंपाची वायर निघून खाली असणाऱ्या पाण्यात पडली व त्याचा त्यास विजेचा धक्का लागला.
मेकॅनिकल इंजिनिअर असलेला सौरभ हा संजय शिलवंत यांचा एकुलता एक मुलगा होता.