
आत गदमातंय,भ्हाईर कोरोनानं दमकारतयं,
त्यात उन्हाची ल्हाही,जतकरांच्या जीवाची होतेय कायली!
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत शहर व परिसरात फेब्रुवारीच्या उत्तरार्धापासून थंडीचा कडाका कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जतकरांना उकाडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. सर्व अंग-अंग घामाने भिजत आहे.
सकाळपासून उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. रात्रीही तापमानात मोठी वाढ होत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवाची घालमेल होत आहे. बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.
गेल्या पंधरावड्यात शहराचे किमान तापमान स्थिरावत होते.या आठवड्यात कमाल तापमानात वाढ होत असल्याचे जाणवत आहे.त्यामुळे शहरवासीयांना पुन्हा पंख्याचा वेग वाढवावा लागला आहे. तर अनेकांनी वातानुकूलित यंत्रे सुरू करून उकाड्यापासून दिलासा मिळवण्याचा प्रयत्न केला. शहरातून थंडी आता पुन्हा गायब झाली आहे. तापमानात दिवसेंदिवस सातत्याने वाढ होऊ लागल्याने, उकाड्यामुळे जतकर हैराण झाले आहेत.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन