अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:
घोलेश्वर ता.जत येथे सालाबादप्रमाणे होत असलेला पिर गौबीसाहेब दर्गा उरूस यावर्षी कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द केला असल्याची माहिती पिर गौबीसाहेब ट्रस्टचे अध्यक्ष महिबूब नाईक यांनी दिली आहे.
नाईक म्हणाले की, देशाला व महाराष्ट्र राज्याला कोरोनासारख्या महाभयंकर रोगाचा सामना करावा लागत आहे. दिवसानुदिवस रुग्ण संख्या वाढत आहेत. त्यामुळे शासन निर्णयानुसार १४ व १५ मार्च,२०२१ रोजी होणारा पिर गौबीसाहेब दर्गा उरूस यावर्षी रद्द करण्यात आला आहे.कोणताही प्रकारे दर्गा परिसरात येऊन गर्दी करू नये असे आवाहन नाईक यांनी केले आहे.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन