प्लॅन व प्रोफाइल बदलून गडबड केल्याचा युवानायक अनिलशेठ पाटील यांचा आरोप

नरेंद्र दिक्षीत
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
आटपाडी येथे राज्यमार्ग दिघंची ते टोप वडगाव नंबर 151 भाग दोन मध्ये आटपाडी येथे चायनीज 117/ 100 ते 117/500 चा प्लॅन व प्रोफाइल बदलून रस्ता गायब केल्याचा आरोप युवानायक अनिलशेठ पाटील यांनी आटपाडी येथे पत्रकार परिषदेत केला. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग व राजपथ कंपनीसह काही राजकीय नेत्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला असून याबाबत तातडीने सुधारणा करण्यात येत असल्याच्या हालचाली सुरू झाल्याची शक्यता आहे.
दिघंची ते टोप वडगाव या राज्य मार्गाचे काम राजपथ कंपनीमार्फत सुरू आहे.या कामांमध्ये सुरुवातीपासूनच अनेक तक्रारींचा ओघ वाढला आहे.आटपाडी येथे चायनीज 117/ 100 ते 117/500 चा सुशोभनीय 400 मीटर अंतराच्या प्रस्तावित रस्त्याला मंजुरी आली होती. परंतु त्याच्या प्लॅन व प्रोफाईलमध्ये बदल करून तो रस्ता गायब केला असल्याची घटना घडली आहे. यामुळे आटपाडीच्या सौंदर्याला व सोयी-सुविधांना बाधा निर्माण झाली आहे. याकामी सार्वजनिक बांधकाम विभागासह ठेकेदार असणारी राजपथ कंपनी दोषी असून राजकीय पुढाऱ्याचा यामध्ये मोठा हात असण्याची शक्यता आहे.
याबाबत युवानायक अनिलशेठ पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही माहिती मागवली.परंतु अद्याप त्यांना माहिती देण्यात आलेली नाही. तसेच त्यांनी ‘माझ्या आटपाडी गावचा हक्काचा रस्ता मंजूर असताना कोणाच्या सांगण्यावरून हा रस्ता दुसरीकडे शिफ्ट केला? असा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे जाब विचारला असता व हे गौडबंगाल उघड होण्याची चिन्हे दिसताच याच मार्गावर सुमारे तीन किलोमीटर अंतरापर्यंतचा नवा रस्ता करण्याचा प्रस्तावित आहे अशी अधिकाऱ्यांनी सारवासारव केली’. याबाबतची माहिती युवानायक अनिलशेठ पाटील यांनी आटपाडी येथे पत्रकार परिषदेत दिली.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन