गाड्या अडवून आंदोलन करणार
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
आटपाडी तालुक्यातील कागदपत्रे नसणाऱ्या वाळू व अन्य वाहतूक करणाऱ्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.कारवाई न केल्यास गाड्या अडवून आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आटपाडी तालुका यांच्यावतीने सांगलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.आटपाडी तालुक्यातील कागदपत्रे नसणाऱ्या, वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या व ओव्हरलोड वाहतूक करणारे डंपर यांना कोणत्याही प्रकारचे आरटीओ परवाने नसतात,त्याचबरोबर त्या वाहनांना नंबर प्लेट नसते, त्या वाहनांचा इन्शुरन्स नसतो,तसेच रात्रीच्या वेळी सुसाट वेगाने धावतात, त्यावर ताबडतोब कारवाई व्हावी,यासंदर्भात निवेदन देण्यात आले.निवेदनाची प्रत आटपाडी पोलीस ठाण्यामध्येही देण्यात येत आहे.
यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या दहा ते पंधरा दिवसात गाड्या रस्त्यावर उभा करून आंदोलन करेल,याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान पुंजारे,वाहतूक सेना तालुकाध्यक्ष दाजी खिलारी, कृषी सेल तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड,तालुका सचिव चंद्रकांत बसरकोडे, धनाजी पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.


संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन