राज्य सरकारच्यावतीने पुतळा उभा करण्याची मागणी
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :
जत शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे काम पंधरा वर्षे सुरू असूनही अद्यापही पुतळा उभारण्यात आला नसल्याने हे जतच्या सर्वच लोकप्रिनिधी अपयशी ठरल्याने आता राज्य सरकारने पुतळा उभा करण्याची मागणी विक्रम ढोणे यांनी केली
जत शहरांमध्ये 1967 साली तालुक्यातील बहुजन समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता.त्याचे लोकार्पण तत्कालीन भारत सरकारचे शेतकी मंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले होते.तालुक्याच्या ठिकाणी हा पुतळा स्वराज्याची स्थापना व शौर्याची गाथा सांगत दिमाखात उभा होता.
2006 मध्ये एका वाहनाच्या धडकेत पुतळ्याचे नुकसान झाल्याने या ठिकाणी नवीन पुतळा उभारण्याचे नियोजन करण्यात आले.त्यासाठी लोकप्रिनिधींनीची समिती स्थापन करण्यात आली. त्यासाठी लोकवर्गणी गोळा करण्यात आली.जत नगरपरिषदेच्या वतीने सन 2014 -15 मध्ये 16 लाख खर्चून चबुतऱ्याचे बांधकाम करण्यात आले,पण अद्याप महाराजांचा पुतळा उभारण्यात आला नाही. त्यामुळे जत तालुक्यातील शिवप्रेमीमध्ये प्रचंड नाराजी असून पुतळा उभारण्यास सर्वच लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत.
प्रशासनाने पुढाकार घेऊन शिवाजी महाराजांचा नियोजित ठिकाणी पुतळा उभा करावा,अशी तालुक्यातील शिवप्रेमीची मागणी आहे.अन्यथा 1 मे 2021 महाराष्ट्र दिनापासून आमरण उपोषण करण्यात येईल,असे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले. विक्रम ढोणे,उदयसिंह संकपाळ,बबन शेख,संभाजी पवार,महादेव चव्हाण,रवी कित्तुरे,बाबू निंबळे,शहाजीबापू वाघमोडे,शिवसेना नेते रफिक भाई शेख आदींच्या सह्या आहेत.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती