अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :
आपल्या देशात थोर संत रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते.
तसेच जतमध्येही मोठ्या थाटामाटात आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
थोर संत रोहिदास यांचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरातील गोवर्धनपुर गावात झाला.त्यांचे वडील संतोख दास जी चपला बनवायचे काम करायचे. रोहिदास यांना लहानपणापासूनच संतांच्या प्रभावाखाली राहण्यास आवडत असत. यामुळे अध्यात्माची गोडी लागली. संत रोहिदास आपल्या कामावर भक्तीने विश्वास ठेवत असत, म्हणून वडिलांनी त्यांना चपला बनविण्याचा काम करण्यास सांगितले. संत रोहिदास परिश्रम घेऊन अत्यंत समर्पितपणे आपले कार्य करीत असत आणि ज्या कोणालाही मदतीची गरज भासली, तेव्हा ते त्यांच्या कामाची किंमत न घेता लोकांना अशी चपला बनवून देत असत. एकदा त्यांच्या गावातले सर्व लोक सणानिमित्त गंगेस्नानासाठी जात होते, तेव्हा सर्वांनी रोहिदास यांना गंगा स्नानासाठी जाण्याची विनंती केली. पण रोहिदास यांनी त्या दिवशी गंगास्नानाला जाण्यास नकार दिला. कारण त्यांनी चपला बनवण्याचे आश्वासन दिले होते आणि ते म्हणाले की जर मी गंगेत स्नान करण्यास गेलो तर माझे लक्ष माझ्या प्रतिज्ञावर असेल, मग जर मी वचन मोडले तर मला गंगास्नानाचे आशीर्वाद कसे मिळतील. ते अशा थोर विचारांचे संत होते.याच विचारांचे अवचित जपण्यासाठी जतमधील शिवाजी पेठ येथील युवकांनी त्यांची जयंती थाटामाटात प्रत्येक वर्षी साजरी करत असतात. यावेळेस आमदार विक्रमसिंह सावंत व नगरसेवक भूपेंद्र कांबळे ,युवा नेते राजू यादव, युवा नेते किशोर झेंडे ,युवा नेते संतोष साबळे, श्री संत गुरु रोहिदास मित्र मंडळ जात सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती