जत येथील शिवयोद्धा मंडळाच्यावतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची जोरदार तयारी

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :

  जत येथील शिवयोद्धा मंडळाच्यावतीने जत शहरातील जि.प.प्रा.मराठी शाळेसमोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंतीची जोरदार तयारी केली आहे.यासाठी येथील त्रिनेत्र डेकोरेटर्सचे मालक प्रसाद खाडे यांनी भव्य मंडप उभा केला असून छत्रपती शिवाजी महाराज यांची मंडपातील सिंहासनारूढ मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
   छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर जतचे माजी आमदार विलासराव जगताप,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते
सुरेशराव शिंदे सरकार, नगरसेवक स्वप्निल शिंदे, जि.प.सदस्य सरदार पाटील आदींनी छत्रपती शिवराय यांना वंदन केले.
   छत्रपती शिवाजी महाराज चौकाला शिवयोद्धा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवशाहीचे स्वरूप आणले असून दिडशे बाय वीसच्या जागेमध्ये मंडळाने भव्यदिव्य असा मंडप उभा करून त्यावर वरील बाजूस छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ आईसाहेब व छत्रपती संभाजी महाराज यांचे डिजीटल लावून या चौकात भव्य अशी विद्युत रोषनाई केल्याने येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव आकर्षक ठरत आहे.
   शिवयोद्धा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते संदिप शिंदे,संग्राम पवार,अजिंक्य सावंत,अमोल चव्हाण, सुहास चव्हाण,इंजिनिअर आश्रय बन्नेनवर,अभय कणसे,आदेश जाधव आदी कार्यकर्ते राबताना दिसत आहेत.