युवानेते रोहितदादा हणमंतराव देशमुख यांनी मंत्री जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केले आयोजन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/दिघंची:
आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक नेते रोहित (दादा )हणमंतराव देशमुख यांनी मंत्री जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिघंची येथे राज्यस्तरीय पालकमंत्री चषक डे-नाईट टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा दि. २० फेब्रुवारीपासुन सुरू केल्या आहेत.
क्रिकेट सामन्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले.यावेळी आयोजक रोहित देशमुख यांनी मान्यवरांचे स्वागत केले.या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष अविनाशकाका पाटील, राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक,अमोल डफळे ,लातूरच्या तहसीलदार सौ.शोभाताई पुजारी, पंचायत समिती सदस्य कुटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आटपाडी तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख,राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष दत्ता यमगर,राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे ओबीसी सेल तालुकाध्यक्ष जालिंदर कटरे, इतर मान्यवर उपस्थित होते.हे सामने राज्यस्तरीय असलेने यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण (लाईव्ह )दाखवले जात आहे.तसेच या पालकमंत्री चषक क्रिकेट स्पर्धेला युवक वर्गातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.हे सामने मंगळवार दि.23/2/2021पर्यन्त डे-नाईट चालू राहणार आहेत. रात्री नऊ वाजता बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.



संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन