वीजबिल माफीसाठी जनता दलाचा आटपाडीत मोर्चा

मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:

कोरोना काळातील सर्व प्रकारची वीजबिले राज्य शासनाने 50 टक्के माफ करावीत या प्रमुख मागणीसह आटपाडी तालुका जनता दलाच्या वतीने आटपाडी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.पन्नास टक्के वीज बिल माफ करावे या मागणीचे निवेदन जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्रा.शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आटपाडीचे सहाय्यक अभियंता संजय बालटे यांना देण्यात आले.
आटपाडी तालुका जनता दलाचे अध्यक्ष आबासाहेब सागर,संताजी देशमुख,बाळासाहेब माळी, गणेश माळी ,बजरंग पाटील, माणिकराव पांढरे, अंकुश मुढे, बजरंग गटकुळे,अनिल यादव, सुरज तोरणे, नामदेव सागर,अल्लाउद्दीन मुलानी, जनार्दन गोंधळी, सुयश कदम, घोलप यांनी मोर्चामध्ये सहभाग घेतला.
घरगुती वीज वापराचे बिल सुरुवातीला 30 टक्के भरल्यास ग्राहकांना कोरोना काळातील थकीत वीज बिलासाठी हप्ते देण्यात येतील, ग्राहकांना पंधरा दिवस अगोदर वीजबिलासाठी नोटीस देण्यात येईल,विज बिल माफीच्या संदर्भातील निवेदन राज्य शासनाकडे पाठवण्यात येईल, शासनाच्या धोरणानुसार बिलाबाबत कार्यवाही करण्यात येईल, ज्या ग्राहकांनी पूर्ण वीज बिल भरले आहे, त्यांनाही सरकारने ठरवून दिलेल्या धोरणाप्रमाणे माफीबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे सहाय्यक अभियंता बालटे यांनी मोर्चादरम्यान सांगितले.