चांदूर बाजार येथे चक्काजाम आंदोलन

रत्नदीप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क / चांदूर बाजार (जि.अमरावती)

चांदूर बाजार येथे शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विषारी असलेले तीन काळे कायदे रद्द करा या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
भाजप सरकारने शेतकऱ्यांविषयी जो निर्णय घेतला तो शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरणार, देशाचा पोशिंदा शेतकरी रस्त्यावर येणार, हे काळे कायदे लागू न होण्यासाठी पंजाब येथे बऱ्याच दिवसांपासून आंदोलन चालू आहे. त्याच आंदोलनाला समर्थन देण्यासाठी चांदुर बाजार तालुक्यातील सर्व शेतकरी एकजूट होऊन राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. या ठिकाणी तालुक्याभरातून शेतकरी या चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले होते.शेतकऱ्यांनी नारेबाजी केली व सरकारने शिवाजी महाराज यांच्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या देशात आम्हाला गुलाम करण्याचे षडयंत्र रचू नये,एकीकडे गरिबांना पोटभर जेवायला अन्न सरकार देऊ शकत नाही,कोरोना काळात दोन रुपयाचे मास्क भाजप सरकार देऊ शकले नाही आणि मेट्रो ट्रेनला हे सरकार देशाचा विकास म्हणते, यावरून या सरकारची लायकी दिसून येते. म्हणून आता मतदार राजा हुशार झाला. येणाऱ्या काळात तुम्हाला तुमची जागा दाखविल्या जाणार आणि शेतकऱ्यांचे जीव घेणारे तिन काळे कायदे रद्द झालेच पाहिजे अन्यथा पुन्हा पुन्हा चक्काजाम आंदोलन केले जाणार असे विचार शेतकरी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.