अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:
माहे फेब्रुवारीमध्ये शासनाकडून शिधापत्रिका शोध मोहिम राबविणेत येत असून जनतेने उत्स्फुर्त सहभागी होवून सहकार्य करावे,असे आवाहन जतचे तहसिलदार सचिन पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाकडून दि.१ फेब्रुवारी ते दि.३० एप्रिल २०२१ या कालावधीत शिधापत्रिका शोध मोहिम राबविणेत येणार असून सदर कालावधीत
बी.पी.एल.,अंत्योदय,अन्नसुरक्षा,अन्नपुर्णा,केशरी,शुभ व आस्थापना कार्ड या सर्वप्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करणेत येणार आहे. सदर शोध मोहिमेत तालुकेतील सर्व शिधापत्रिकाधारकांनी विहीत नमुन्यातील फॉर्म भरुन त्या त्या गावच्या स्वस्त धान्य दुकानदारांकडे व गावकामगार तलाठी यांचेकडे जमा करणेच्या आहेत. सदर फॉर्मसोबत शिधापत्रिकाधारकांनी ते त्या गावात रहात असल्याचा पुरावा जोडणेचा आहे. पुरावा म्हणून उदा.भाडे पावती,निवासस्थानाच्या मालकीबाबतचा पुरावा,LPG जोडणी क्रमांक,बँक पासबुक झेरॉक्स,विजेचे देयक, टेलिफोन/मोबाईल देयक,ड्रायव्हींग लायसन्स, ओळखपत्र(कार्यालयीन/इतर), मतदार ओळखपत्र,आधार कार्ड व तहसिलदार,जत यांचा
वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादीच्या छायांकित प्रती जोडणेच्या आहेत. पुरावा हा एक वर्षाहून जास्त कालावधीपेक्षा जूना असू नये. तरी तालुक्यातील सर्व शिधापत्रिका धारकांनी विहीत नमुन्यातील फॉर्म परीपुर्ण भरुन त्यासोबत पुरावा म्हणून नमुद केलेली सर्व कागदपत्रे जोडून आपले गावचे स्वस्त धान्य दुकानदार व गावकामगार तलाठी यांचेकडे जमा करणेचे आहे. याबाबत कुणीही दुर्लक्ष व टाळाटाळ करु नये व शासनाच्या सदर शिधापत्रिका शोध मोहिमेत सहभागी होवून सहकार्य करावे असे आवाहन तहसिलदार सचिन पाटील यांनी केले आहे.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती