अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
राज्यातील महिलांना सक्षम बनविण्यासाठी महिला बालविकास मंत्रालयाने महिलांसाठी नवतेजस्वीनी प्रकल्प हाती घेतला असून येत्या २४ फेब्रुवारी २०२१ रोजी या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येत असून दुष्काळी जत तालुक्यासाठी नवतेजस्वीनीचे दोन प्रकल्प दिले जातील असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री सौ.यशोमती ठाकूर यांनी केले आहे.
जत येथील भारती विद्यापीठ महिला संकुलाचे नामकरण स्व.श्रीमंत किर्तिमालिनिराजे डफळे असे करण्यात आले.त्या कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला जत संस्थानच्या राजमाता स्व. श्रीमंत किर्तिमालिनिराजे डफळे यांचे नाव असलेल्या नामफलकाचे अनावरण राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री सौ.यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री डाॅ. विश्वजित कदम म्हणाले,जत संस्थानच्या राजमाता स्व.श्रीमंत किर्तिमालिनिराजे डफळे व डाॅ.पतंगराव कदमसाहेबांचे अपुलकीचे नाते होते.डाॅ.कदमसाहेबांना भारती विद्यापिठाच्या महिला उपक्रमासाठी जागेची गरज लक्षात घेऊन माँसाहेबांनी मोठ्या उदार अंत:करणांनी आपली महिला मंडळाची जागा देऊ केली.आता या जागेवर भारती विद्यापीठाची भव्य वास्तू ऊभारली असून त्या वास्तूला स्व.माँसाहेब यांचे नाव दिले आहे.यापुढे या वास्तूत महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील असेही डाॅ. कदम म्हणाले.
आम्ही दुष्काळी जत तालुक्यातील जनतेच्या समस्या माहीत व्हाव्यात यासाठी महिला व बालविकास मंत्री सौ.यशोमती ठाकूरताई व राज्याचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांना यासाठी बोलावले असून ते निश्चितच जत तालुक्याला मदत केल्याशिवाय राहणार नाहीत.
याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना कृषीमंत्री दादासाहेब भुसे म्हणाले की, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे शेतकरी वर्गाला अन्नदाता न म्हणता अन्नदेवता असे म्हणतात. महाविकास आघाडी सरकार हे शेतकरी बांधवांचे सरकार असून त्यांनी सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांची सोळा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली.शेतकरी बांधवांनी शेतीमध्ये नवनविन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगती करावी असे आवाहनही त्यानी केले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक महेंद्र लाड, डफळे राजघराणेचे वारसदार श्रीमंत इंद्रजित उर्फ बाबाराजे डफळे, श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे ,श्रीमंत ज्योस्नाराजे डफळे,निवृत्त कर्नल भगतसिंग देशमुख, सौ.मंगलाराजे देशमुख,
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील,माजी आ. ऊमाजीराव सनमडीकर, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, कार्याध्यक्ष नाना शिंदे,विकास माने, निलेश बामणे,सौ.सुषमा विक्रम सावंत, सौ.मिनलदिदी सावंत पाटील, बाबासाहेब कोडग,समाधान शिंदे, विठ्ठलराव शिंदे, विक्रम शिंदे,आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन माने-पाटील यांनी केले .प्रास्ताविक व स्वागत एच.एम.कदम यांनी केले. आभार इराण्णा निडोनी यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विक्रमसिंह सावंत फौंडेशनचे अध्यक्ष अॅड. युवराज निकम, जागर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे ,सलिमभाई पाच्छापूरे, ईराण्णा निडोनी, संतोष भोसले, गणेश गिड्डे,काकासाहेब शिंदे, दिलीप सोलापूरे, बंडू शेख, धैर्यशील सावंत, बाळासाहेब तंगडी, मिथून माने, आदिंनी परिश्रम घेतले.



संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती