अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंचचा ज्येष्ठ नागरिक मेळावा संपन्न

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /इस्लामपूर:
अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंच व ज्येष्ठ नागरिकांचे जीवन गौरव अभियान मेळावा बचतधाम कार्यालय वाळवा,पंचायत समिती इस्लामपूर याठिकाणी संपन्न झाला.याप्रसंगी सांगली,सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजींच्या ‘खरा तो एकची धर्म,जगाला प्रेम अर्पावे’ या प्रार्थनेने केली.या मेळाव्यास अर्थक्रांती कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पी.के.पाटील, आप्पासाहेब हिंदुराव देसाई व अर्थक्रांती सांगली जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. विजयकुमार स्वामी, अर्थक्रांती सांगली जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ मोरे-पाटील, अर्थक्रांती सांगली जिल्हा सचिव गजानन पाटील,सल्लागार सांगली जिल्हा गोविंदराव परांजपे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.याप्रसंगी पाहुण्यांचे स्वागत,परिचय व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर मोरे,अर्थक्रांती सांगली जिल्हा कोषाध्यक्ष यांनी केले.मेळाव्याचे प्रास्ताविक भाषण अर्थक्रांती जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील यांनी केले.आपल्या भाषणात त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना सन्मानधन रुपये दहा हजार महागाई भत्ताला जोडलेले मिळावे,ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र मंत्रालय स्वतंत्र कॅबिनेट मंत्री व त्या खात्यात स्वतंत्र बजेट मिळावे,ज्येष्ठ नागरिकांना सन्मानासाठी ॲट्रॉसिटीसारखा कायदा बनवण्यात यावा,तसेच संरक्षण वाहतूक कायदा व सुव्यवस्था इत्यादी नागरी सुविधा विशेष श्रेणीच्या स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जाव्यात व प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्तीत म्हणून घोषित करण्यात यावी. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येते केले की,आपण अर्थक्रांती जीवनगौरव अभियानामध्ये रुपये दहा सहभाग मूल्य देऊन आपली नोंदणी करावी. याप्रसंगी डॉ. विजयकुमार स्वामी यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.अॅड.किरण पाटील यांनी ज्येष्ठांना कायदेविषयक सल्ला व सुविधा मोफत पुरविण्यात येतील असे सांगितले.गोटखिंडीचे डी.वाय. पाटील यांनी ज्येष्ठांना मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात पी.के.पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या कुटुंबात येत चाललेला दुरावा दूर करण्यासाठी ज्येष्ठांना सन्मानधन मिळालेच पाहिजे, त्यामुळे फार मोठा सामाजिक प्रश्न आपोआप सुटेल. त्यामुळे सरकारच्या न्यायव्यवस्थेवरील तान कमी होईल. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनुप वाडेकर यांनी केले. याप्रसंगी उपाध्यक्ष वाळवा तालुका विजयराव लोंढे, कोषाध्यक्ष हनुमंतराव पाटील दादा, सचिव आर.एन.मोहिते, संघटक नारायण सावंत, शिराळा तालुका अर्थक्रांती सदस्य भगवान पाटील, खानापूर विटा अध्यक्ष रघुराज मेटकरी, कोल्हापूर जिल्हा हिंदुराव पवार, कडेगाव तालुका फडणीस नाना,सदस्य आनंदराव जाधव,काशिनाथ गावडे,डी.के.मोरे,रेठरेहरणाक्ष बांधकाम संघटना सांगली जिल्हा अध्यक्ष श्रीनिवास गायकवाड,सिताराम कांबळे,कवठेमंकाळ अण्णासाहेब पाटील, कवठेमंकाळ बंडू अण्णा गडदे बार्शी याप्रसंगी अर्थक्रांती सांगली जिल्हा व वाळवा तालुक्यातील सर्व सदस्य उपस्थित होते.या कार्यक्रमास अनुलोम संस्थेचे केदार माळवदे,बांधकाम कामगार जिल्हाध्यक्ष निवास गायकवाड यांनी मोलाचे सहकार्य केले.प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूरचे मानद सचिव प्रवीण माने यांनी ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक सोमवार व शुक्रवार या दिवशी मोफत तपासणी व उपचार केले जातील,त्याचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी इस्लामपूर राष्ट्रवादी शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी मंत्री जयंत पाटील यांच्याकडे हा प्रस्ताव ठेवू,यावेळी बांधकाम कामगार यांचे वतीने ज्येष्ठ नागरिकांची मोफत डोळे तपासणी करण्यात आली.