ग्रामपंचायत निवडणूक खर्चाची माहिती निकालापासून महिन्यात सादर न केल्यास कारवाई:तहसिलदार सचिन पाटील

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जत तालुक्यातील दि.१५ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत झालेल्या खर्चाची माहिती निवडणूक निकाल लागल्यापासून एक महिन्याच्या आत उमेदवारानी निवडणूक विभागाकडे सादर न केल्यास सबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहीती निवडणूक अधिकारी तथा जतचे तहसिलदार सचिन पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.
त्यानी पत्रकात म्हटले आहे की,जत तालुक्यात दि.१५/१/२०२१ रोजी ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत,त्या ग्रामपंचायतीमध्ये ज्यांनी उमेदवार म्हणून सहभाग घेतलेले आहेत,त्या सर्व उमेदवारांनी दि.१८ जानेवारी २०२१ निवडणूक निकाल झालेपासून एक महिन्याच्या आत शासनाचे ट्रू व्होटर अॅप वर निवडणूक खर्चाची माहिती नमुना नंबर १/२/३/४मध्ये भरून त्याची प्रत आरओ/एआरओ यांच्यामार्फत तपासणीअंती आरओ यांच्यामार्फत तपासणी पथकाकडे सादर करावी.
जे उमेदवार आपणास निवडणुक प्रक्रियेत आलेल्या खर्चाची माहिती सादर करणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध कडक कारवाईची तरतूद आहे.त्यामुळे उमेदवारांनी वेळीच खर्चाची माहिती सादर करावी, अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार सचिन पाटील यांनी प्रसिद्ध पत्रकाव्दारे दिली आहे.