सांगली येथे ओबीसी संघटनेच्या मेळाव्याला सर्वांनी हजर रहावे:कामगार नेते हरिदास लेंगरे

नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

येत्या २७ तारखेला ओबीसींचा महामेळावा सांगलीमध्ये होणार आहे.या मेळाव्याच्या नियोजनाची बैठक आज सांगली येथील मार्केट यार्डमधील सहकार भवनात पार पडली.यावेळी कामगार नेते हरिदास लेंगरे यांनी ओबीसीच्या सर्व कार्यकर्त्यांना असे आव्हान केले की सर्वांनी आपल्या बायकापोरांसह घराला कुलूप लावून या मेळाव्यात हजर रहावे.ही लढाई ओबीसीच्या अस्तित्वाची आहे.त्यामुळे जिल्ह्यातील सकल ओबीसीं बांधवांनी या लढ्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन कामगार नेते हरिदास लेंगरे यांनी केले आहे.ओबीसीचा घटक आजही सर्व सुख-सुविधांपासून वंचित आहे.आरक्षणासंदर्भात यात कोणत्याही प्रकारची घुसखोरी होऊ द्यायची नसेल तर घराघरांमध्ये हा विचारावा वनवा पेटला पाहिजे. सांगली ही क्रांतीकारकांची भूमी आहे. या भूमीमध्ये २७ तारखेला विचाराची ठिणगी पडणार आहे आणि हीच विचाराची ठिणगी महाराष्ट्रभर झाल्याशिवाय राहणार नाही.म्हणून या मेळाव्यासाठी ओबीसी समाजाने पूर्ण ताकतीने हा मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे म्हणाले की, ओबीसी एकवटणार आणि या महाराष्ट्रामध्ये राजकीय क्रांती घडणार हे सांगण्यासाठी कोणा भविष्यकारांची गरज नाही. यावेळी प्राचार्य लक्ष्मण हाके यांनी बोलताना सांगितले की, ओबीसी समाज ५२% आहे.परंतु गेले ७० वर्ष झालं राजकारणापासून यांना जाणून-बुजून (लांब) वंचित ठेवण्याचे पाप प्रस्थापितांनी केले आहे.अरुण खरमाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गुरव समाजाचे बाळासाहेब गुरव,प्रदीप वाली ,कुंभार समाजाचे हनुमंत कुंभार ,नाभिक समाजाचे हनुमंत गायकवाड,सर्व समाजाचे अध्यक्ष व सदस्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.