सोलापूरच्या सीईओंनी माळशिरसमध्ये घेतला आढावा

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:

माळशिरस पंचायत समितीमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विविध विषयांवर आढावा बैठक घेतली.
यामध्ये जीवन मिशन अंतर्गत नळजोडणी,अंगणवाडी व शाळांमधील नळजोडणी पूर्ण करणे, महाआवास योजनेअंतर्गत फेब्रुवारीअखेर जास्तीत जास्त घरे बांधणे,25 जानेवारी रोजी प्रबोधन फेरी काढून कोरोनाविषयक जनजागृती, मतदारांना मतदार दिनानिमित्त जनजागृती, 27 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पाचवी ते सातवीच्या शाळांमध्ये विद्यार्थी पाठवण्याविषयी जनजागृती करणेबाबत मार्गदर्शन केले.शंकरनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन कोरोना व पोस्ट कोविंड ऍक्टिव्हिटीचा आढावा घेतला.बागेचीवाडी येथील घरकुलाचा भेट दिली.पानीव,अकलूज ग्रामपंचायतीस भेट देऊन दप्तर व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे काम पाहिले.उमेद योजनेचा आढावा घेतला.अधिकारी व ग्रामसेवकांना कामाकडे सकारात्मकतेने बघून जनतेची कामे पार पाडावे असे आवाहन केले.प्रांतअधिकारी यांच्याशी पालखी मार्गामध्ये अधिग्रहित झालेल्या जिल्हा परिषद मालमत्तेची माहिती घेतली.
उपसभापती अर्जुंसिंह मोहिते यांनी स्वागत केले. गटविकास अधिकारी यांनी आभार मानले.सभापती शोभा साठे,पंचायत समिती सदस्य सकट, पालक अधिकारी शेलार उपस्थित होते.