असंघटित कामगारांनी संघटित होऊन मोठी स्वप्ने पहावीत : दिनकर पतंगे

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:
27 जानेवारी 2021 रोजी मासाहेब घरकुल प्रक्षेत्र कुंभारी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर याठिकाणी महाराष्ट्र कामगार सेनेतर्फे सर्व कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी या भागातील जवळपास 250 कामगारांनी सहभाग घेतला होता. प्रमुख पाहुणे म्हणून दिनकर पतंगे यांनी उपस्थित कामगारांना संघटित होऊन आपण मोठी स्वप्ने पहावीत.त्याचबरोबर सर्व असंघटित कामगार एकत्र येऊन आपल्या अडचणीवर विचारविनिमय करून त्यातून मार्ग काढावा,यासाठी त्यांनी धीरूभाई अंबानी, संजय घोडावत यांची उदाहरणे देऊन कामगारांना प्रणित केले.त्याचबरोबर कष्ट करण्याची ताकद निर्माण करण्यात आली. तसेच धूम्रपान कायदा लागू झाल्याने कामगारांचा प्रश्न गंभीर होऊन बसलेला आहे. याबाबत शासनाने या बिडी कामगारांना गारमेंटसारखे उद्योग काढून घेऊन त्यांचे उपजीविकेचे साधन निर्माण करून घ्यावे,असे मत दिनकर पतंगे यांनी व्यक्त केले.यावेळी कामगार कल्याण अधिकारी सी.बी.जाधव यांनी कामगार मंडळाच्या विविध योजनेबाबत मार्गदर्शन केले.तसेच पेंटप्पा गड्डम अध्यक्ष यंत्रमागधारक संघ सोलापूर यांनी यांचे उद्योजक व कामगारांची नाते याबाबत मार्गदर्शन केले. श्री पद्माताई म्हणता सल्लागार कामगार सेना यांनी आपले परखड विचार मांडले. विष्णू कारमपुरी महाराज यांनी अध्यक्षीय भाषण केले.त्यांनी कामगारांच्या हिताचे दोन ठराव मंजूर करून घेतले व कामगारांना मोठी ताकद दिली.यावेळी शेट्टी ,रघुनाथ दामले ,यांनी आपले मनोगत मांडले.