कामगारांच्या विविध मागण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेकडून खा.संजय राऊत यांना निवेदन
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत तालुक्यामध्ये दिनकर पतंगे हे नेहमीच सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग घेत असतात.आजपर्यंत तालुक्यात त्यांनी विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले असून त्यांचे सामाजिक कार्य हे उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी केले.
कामगारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस कारमपुरी महाराज व प्रदेश राज्य उपाध्यक्ष दिनकर पतंगे तसेच कामगार सेनेचे नेते शिवा ढोकळे यांनी लिखित स्वरूपात ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासो पाटील, गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार संजय राऊत यांना निवेदन दिले.तसेच राऊत यांना यासाठी अनुदान मिळणेबाबत पत्र देऊन तालुक्याच्या विकासाबाबत समक्ष चर्चा करण्यात आली. तालुक्याच्या विकासासाठी जादा फंड देण्याचे आश्वासन दिले व पुढील कामाचे नियोजन केले.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती