मोहनराव पुजारी
प्रकल्भनायक न्यूज नेटवर्क /सांगली:
जिल्ह्यात १४२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंदाजे सरासरी ८०.२० टक्के मतदान झाले.३ लाख १३ हजार ३७६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये स्त्री मतदार १ लाख ४९ हजार ६१७, पुरूष मतदार १ लाख ६३ हजार ७५७ व २ इतर मतदारांचा समावेश आहे.
जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी अंतिम अंदाजीत तालुकानिहाय झालेले मतदान व कंसात मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे. मिरज एकूण ग्रामपंचायती २२, झालेले मतदान ९१ हजार ७९४ (७८.४५ टक्के), तासगाव एकूण ग्रामपंचायती ३६, झालेले मतदान ७६ हजार ५७७ (७९.८१ टक्के), कवठेमहांकाळ एकूण ग्रामपंचायती १०, झालेले मतदान १३ हजार ९५ (८३.६८ टक्के), जत एकूण ग्रामपंचायती २९, झालेले मतदान ४७ हजार ५९६ (८३.३८ टक्के), आटपाडी एकूण ग्रामपंचायती ९, झालेले मतदान १३ हजार ६७७ (७७.७९ टक्के), विटा एकूण ग्रामपंचायती ११, झालेले मतदान १५ हजार ३५७ (७६.११ टक्के), पलूस एकूण ग्रामपंचायती १२, झालेले मतदान ३३ हजार ४४८ (८२.६० टक्के), कडेगाव एकूण ग्रामपंचायती ९, झालेले मतदान १५ हजार ७६९ (८०.३६ टक्के), वाळवा एकूण ग्रामपंचायती २, झालेले मतदान २ हजार ५४० (८५.८७ टक्के), शिराळा एकूण ग्रामपंचायती २, झालेले मतदान ३ हजार ५२३ (८३.०७ टक्के)
ही आकडेवारी अंदाजित असून आकडेवारीचा ताळमेळ घेतल्यानंतर अंतिम आकडेवारीबद्दल माहिती दिली जाईल,असे जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.


संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन