जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज:तहसिलदार सचिन पाटील

अनिल मदने
प्रकल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:    

   जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज आहे अशी माहिती जतचे तहसिलदार सचिन पाटील यांनी दिली.
     यावेळी तहसिलदार सचिन पाटील म्हणाले,जत तालुक्यातील एकूण 30 ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. एका ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. 29 ग्रामपंचायतिमध्ये लढत होत आहे. यासाठी 246 सदस्यत्व पदाकरीता  542 एवढे उमदेवार रिंगणात आहेत.यासाठी 118 मतदान पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.या मतदान पथकाचे पहिले व दुसरे प्रशिक्षण  पार पडले आहे.सर्व मशीनचे  शिलींगची प्रकिया पार पडली आहे.
   दिनांक 14 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतदान पथकांना साहित्य वाटप करण्यात आले आहे. दिनांक 15 जानेवारी रोजी सकाळी 7 :30 ते 5:30 या वेळेत मतदान होणार आहे. यासाठी संपूर्ण प्रकियेवर लक्ष ठेवण्यासाठी 5 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. याशिवाय 11 झोनल ऑफिसरची नेमणूक करण्यात आली आहेत. कायद्या व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये म्हणून पारदर्शक स्वरूपात मतदान व्हावेत यासाठी पोलीस विभाग तसेच नेमण्यात आलेले कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.