अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंचची जिल्हा बैठक संपन्न

मोहनराव पुजारी
प्रकल्भनायक न्यूज नेटवर्क /सांगली:

राष्ट्रीय अर्थक्रांती आर्थिक साक्षरता मंचच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक एम.टी.अग्रवाल नगरवाचनालय, माधवनगर येथे पार पडली. जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे-पाटील अध्यक्षस्थानी होते.सचिव गजानन पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना 10,000 रुपये मासिक सन्मानधन मिळावे,ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी ॲट्रॉसिटीसारखा कायदा निर्माण व्हावा,ज्येष्ठांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे,ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती घोषित करावी यासारख्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
आर्थिक साक्षरता मंचच्यावतीने जिल्हास्तरावर ज्येष्ठ नागरिकांना समाविष्ट करून घेण्यासाठी तालुकानिहाय कार्यक्रम करण्याचे ठरले.अर्थक्रांतीच्या घटनेनुसार सभासद धोरण अवलंबणेबाबत एकमत झाले.भवितव्यातील अनेक मुद्यांची चर्चा होऊन बैठक संपन्न झाली.
अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंचचे उपाध्यक्ष एकनाथ पवार,सल्लागार गोविंद परांजपे,ज्येष्ठ नागरिक मित्र अनुप वाडेकर, बाबासाहेब सूर्यवंशी, काशिनाथ गावडे,बाळासाहेब सूर्यवंशी,नारायण सावंत, अरविंद भोसले,भगवान पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.