मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
करगणी व परिसरातील पाणीपुरवठा योजना व्यवस्थित चालू राहण्याकरिता अध्यक्ष उमेश पाटील हे शेटफळे नळपाणी संस्थेसोबत अनेक उपाययोजना राबवित आहेत.याचाच एक भाग म्हणून आटपाडी तालुका ग्रामीण विकास संस्थेने आज करगणी येथे शिबीर घेऊन लोकांना वेळेत पाणीपट्टी भारण्याविषयी जागृत केले.
सदर कार्यक्रमास करगणीचे नेते उत्तम माने,भारत पाटील, श्रीधर खिलारी, मुद्दसर इनामदार, किसन काळे, विष्णू मंडले, रमेश मंडले, बरकत शेख, दुर्योधन पाटील, तळेवाडीचे नेते लक्ष्मण दाजी सरगर, पात्रेवाडीचे अनिल शेठ गायकवाड, माळेवाडीचे महादेव जगताप, पवार सर, बाळेवाडीचे संजय कोळेकर, आगतराव खताळ, हिवतडचे अभिजित देशमुख, सुधीर देशमुख, शहाजी यमगर, गोमेवाडीचे संपतराव पाटील, मुन्ना भय, उत्तम काळे, उत्तम कदम, जावीर सर, रोहित देवकुळे, बिरू सरगर काळेवाडीचे बाळु काळे, राजू सस्ते, सदाशिव काळे तसेच शेटफळे नळपाणी संस्थेचे शरद पाटील, वसंतराव गायकवाड उपस्थित होते.आटपाडी तालुका ग्रामीण विकास संस्थेकडून नवाज जमादार, उमाजी चव्हाण, मिलिंद मंडले, चिकू पांढरे यांनी मार्गदर्शन केले.आभार नागमळीचे युवा नेते विशाल सरगर यांनी मानले.


संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन