अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत तालुक्यातील संख येथे सयाजी बाबा बिसलरी प्लॅन्टचा शुभारंभ विजापूर येथील ज्ञानयोगी परमपूज्य सिध्देश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आला.
संख येथील श्री संत बागडेबाबा आश्रमाच्या आवारात चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी श्री संत बागडेबाबा यांचे मंदिर उभारण्याचे काम सुरू केले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहेत. तसेच याच ठिकाणी सयाजी बाबा बिसलरी प्लॅन्ट उभारण्यात आला आहे. ज्ञानयोगी परमपूज्य सिध्देश्वर महास्वामीजी यांनी संख येथील आश्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिराच्या कामाची पाहणी केल्यानंतर तुकाराम बाबा महाराज यांनी सुरू केलेल्या सयाजी बाबा बिसलरी प्लॅन्टचे उदघाटन यांच्या हस्ते झाले.
यावेळी बालगाव येथील गुरुदेव आश्रमचे डॉ.अमृतानंद महास्वामीजी, इचलकरंजी गुरुदेव आश्रमाचे महेशानंद स्वामीजी, बिळूर गुरुदेव आश्रमाचे महेशानंद स्वामीजी, जत पंचायत समितीचे माजी सभापती आर. के. पाटील, रासपचे माजी जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील, रासपचे शहराध्यक्ष भूषण काळगी, संतोष पाटील,सजेय धुमाळ, मानव आदीकारी पुणे यांच्यासह संख ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.
यावेळी बोलताना सिद्धेश्वर म्हास्वामीजी यांनी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक केले. तुकाराम बाबा महाराज यांनी कोरोनाच्या काळात जे निस्वार्थपणे कार्य केले,त्यातून त्यांची सामाजिक बांधिलकी तर दिसून आलीच पण त्याचबरोबर संतांच्या पावलावर पाऊल ठेवत त्याचे कार्य सुरू आहे याचा मनस्वी आनंद वाटला. श्री संत गाडगेबाबा, श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या विचाराचे पाईक होत त्यांनी जे समाजकार्य सुरू केले आहे त्याला तोड नाही. तुकाराम बाबा महाराज यांनी भविष्यातही असेच सामाजिक कार्य दुष्काळी जत तालुक्यात सुरूच ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.
इचलकरंजी गुरुदेव आश्रमाचे महेशानंद स्वामीजी यांनीही तुकाराम बाबा महाराज यांच्या कार्याचे मनापासून कौतुक करत त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
बाबा जलचे उत्पन्न सामाजिक कार्याला
दुष्काळी जत तालुक्यातील प्रत्येक गावात जल चळवळ उभी राहिली पाहिजे यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. जत तालुक्यातील सामाजिक कार्यासाठी अहोरात्र झटण्याची आपली तयारी आहे. श्री संत बागडेबाबा मानव मित्राच्या माध्यमातून जत तालुक्यात सामाजिक कार्य सुरूच राहणार आहे. संख येथे बाबा जल या बिसलीरी प्लॅन्टचा शुभारंभ करण्यात आला आहे. यातून जे उत्पन्न मिळणार आहे ते जत तालुक्यातील सामाजिक कार्यासाठी खर्ची करण्यात येणार असल्याचे चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी यावेळी बोलताना सांगितले.


संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन