मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:
आटपाडी येथे आटपाडी तालुका विधी सेवा समिती व वकील संघटना ,आटपाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी व फौजदारी न्यायालय क स्तर येथे दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश मा.जे.आर.घाडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले.
कोरोनाबाबत योग्य ती खबरदारी घेऊन लोकआदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला.या लोकआदालतीमध्ये दिवाणी,फौजदारी अशी प्रलंबित प्रकरणे तसेच बँक रिकव्हरीबाबत वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती.कोरोना काळामध्ये भरवण्यात आलेल्या या लोक अदालतीमध्ये 31 दिवाणी प्रकरणे, 123 फौजदारी प्रकरणे व 890 वादपूर्व प्रकरणे अशी एकूण 1044 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 8 दिवाणी प्रकरणे,22 फौजदारी प्रकरणे आणि 11 वादपूर्व प्रकरणे अशी एकूण 41 प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली.तडजोड झालेल्या सर्व प्रकरणांमधून एकूण 30 लाख, 39 हजार, 327 रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली.
आटपाडी वकील संघटनेचे अध्यक्ष आर.व्ही. कुलकर्णी,ज्येष्ठ विधिज्ञ जे.एम.महामुनी,व्ही.बी.पाटील, एस.आर.कदम, व्ही.एस.दाणी उपस्थित होते.
ॲड.सी.व्ही.जाधव,व्ही.बी.सावंत,ए.डी.वसेकर,एल.आर.माळी,एन.आय.पटेल,एम.यु.भोसले,एस.एस.देशमुख यांनी तडजोडीने प्रकरणे मिटवणेकामी सहभाग घेतला.बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकारी व कर्मचारी,दिवाणी न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक डी.एन.कांबळे उपस्थित होते.
लोकअदालतप्रसंगी पॅनल मेंबर म्हणून ॲड. वैष्णवी कुलकर्णी,सामाजिक कार्यकर्ते अरविंद चांडवले यांनी काम पाहिले. तालुका विधी सेवा समितीचे व्यवस्थापक ए.एम.जमादार यांनी लोकअदालतीचे व्यवस्थापन केले.


संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन