२४ तारखेपर्यंतच मिळणार रेशन दुकानातील डाळ:तहसिलदार सचिन पाटील

अनिल मदने 
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत: 

शासनाकडून मोफत दिली जाणारी डाळ योजनापात्र लाभार्थी यांनी सरकारी धान्य दुकानदारांकडून प्राप्त करुन घ्यावी,असे आवाहन जत तहसिलदार सचिन पाटील यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारणेत आलेल्या लॉकडाऊन काळात योजनापात्र लाभार्थी यांना शासनाकडून माहे जुलै,ऑगस्ट,सप्टेबर,ऑक्टोबर २०२० करीता मंजूर करणेत आलेली मोफत हरभरा डाळ तालुक्यातील सर्व दुकानदारांना तालुका
शासकीय गोदामाकडून पोहच करणेत आलेली आहे. तरी तालुक्यातील अन्नसुरक्षा व अंत्योदय योजनापात्र लाभार्थी यांनी प्रति महिना, प्रती कार्डधारक १ किलो या प्रमाणात देय असणारी हरभरा डाळ आपले गावचे सरकारी धान्य दुकानदारांकडून तात्काळ प्राप्त करुन घ्यावी. ज्या योजनापात्र लाभार्थी यांनी अद्यापी एकूण एकंदर महिन्याची मोफतची हरभरा डाळ प्राप्त करुन घेतलेली नाही किंवा काही महिन्याची हरभरा डाळ प्राप्त करुन घेतली तर काही महिन्याची प्राप्त करुन घेणे शिल्लक आहे,त्यांनी दि. २४ डिसेंबर २०२० या अंतिम देय मुदतीअखेर प्राप्त करुन घ्यावी.या मोफत डाळीचे वितरण इपॉस मशिन ट्रान्झेक्शनव्दारेच करणेच्या शासनाच्या सुचना असलेने दि.२४ डिसेंबर २०२० या अंतिम वितरण मुदतीनंतर कोणत्याही योजनापात्र लाभार्थी यांना मोफतच्या हरभरा डाळीचे वितरण होवू शकनार नाही,याची तालुक्यातील योजनापात्र लाभार्थी यांनी नोंद घ्यावी,असे आवाहन जत तहसिलदार सचिन पाटील यांनी केले आहे.